Makar Sankrant 2024

महाराष्ट्र मंडळ म्युनिक

Makar Sankrant 2024

1528 1528 people viewed this event.

✨ मकर संक्रात २०२४ ✨

नमस्कार मंडळी !

आपणा सर्वांना महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या नवीन कार्यकारिणी तर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

या वर्षी आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्यासाठी खास कार्यक्रम घेऊन येणार आहोत. संपूर्ण वर्षभराच्या विविधरंगी कार्यक्रमांची सूची आम्ही लवकरच जाहीर करू.

यावर्षीचा पहिला कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित केला आहे. निमित्त आहे मकर संक्रांतीचे हळदीकुंकू ✨

कार्यक्रम – मकर संक्रांतीचे हळदीकुंकू
दिनांक – २० जानेवारी, शनिवार
वेळ – ९ ते १
स्थळ – Einewelt Haus, Schwanthalerstraße 80, 80336 München

मग विचार काय करताय ?
भरजरी साड्या, दागदागिने शोधून ठेवा ! हळदीकुंकू म्हंटलं की थोडंफार नटून-थटून जायलाच हवं, नाही का ?

विशेष सूचना :

📍विशेष आकर्षण: संक्रातीच्या वाणाची देवाणघेवाण ! सर्वांनी ७ ते १० युरोपर्यंतचे वाण घेऊन यावे.
📍कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर बंधन आहे. त्यामुळे प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
📍कार्यक्रम फक्त महिला आणि त्यांच्या सोबतची लहान मुले (घरी राहू न शकणारी) यांच्यासाठीच राखीव आहे.
📍कार्यक्रमात महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या सभासदांसाठी छोट्याश्या भेटवस्तूचे वाटप करण्यात येणार आहे.

आपले स्नेहाभिलाषी,
कार्यकारिणी २०२४
महाराष्ट्र मंडळ म्युनिक

Event registration closed.
 

Date And Time

20-01-2024 @ 09:00 AM to
20-01-2024 @ 01:00 PM
 

Registration End Date

19-01-2024
 

Event Category

Share With Friends