This initiative is supported by:

नमस्कार पालक हो,

म्यूनिकमध्ये आपल्या छोट्या बालमित्रांसाठी मराठी शाळा असावी असे मंडळाचे एक स्वप्न आणि पालकांची मागणी होती. त्या उपक्रमाला पालकांचा आणि स्वयंसेवकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र मंडळ म्युनिकने आपल्या छोट्या बालमित्रांसाठी “माय मराठी” (Culture Beyond Borders) हा उपक्रम एप्रिल २०१९ पासुन सुरु केला आहे.

विशेष म्हणजे, मंडळाने भारती विद्यापीठ, पुणे यांच्या सोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार भारती विद्यापीठ आपल्या “माय मराठी” या उपक्रमातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, पुस्तके आणि परीक्षा प्रमाणपत्रे देणार आहे.

“माय मराठी” या उपक्रमाचे धोरण असे आहे:

१. मराठी लिहिणे, वाचणे व बोलणे शिकवले जाईल.
२. मराठी संस्कृती, इतिहास, सण आणि उत्सव यांची माहिती करून देणे ह्यावरही भर असेल.
३. गोष्टी, गाणी, खेळ आणि मुलांना आवडतील असे प्रकल्प अशा माध्यमांमधून मुलांना मराठी शिकवले जाईल.
४. नाव नोंदणी केलेल्या पाल्यांच्या वय आणि मराठी विषयाच्या ज्ञाना नुसार वर्ग विभागणी केली जाऊ शकते.

नाव नोंदणी साठी इथे क्लिक करा https://mmmunich.com/maay-marathi-enrollment/

माय मराठी वेळापत्रक – सत्र तिसरे
(सकाळी १०.०० ते १२.००)

१. रविवार दिनांक १९ जानेवारी २०२०
२. रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२०
३. रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२०
४. रविवार दिनांक १ मार्च २०२०
५. रविवार दिनांक १५ मार्च २०२०
६. रविवार दिनांक २२ मार्च २०२०

स्थळ:
Stadtteilkulturzentrum
Guardinistr 90,
81375 Munich
(*वेळ आणि ठिकाण बदलणे बाबतचे अंतिम अधिकार मंडळाचे राहतील.)

अधिक माहितीसाठी संपर्क करा

माय मराठी समीती

समन्वयक (coordinator) – डॉ. प्रवीण पाटील
मराठी विषय तज्ञ – अपर्णा लपालीकर
शालेय व्यवस्थापन – राहुल जोशी

[email protected]