MMM Diwali Ank

महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या ‘पालवी’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन म्युनिकमधील भारतीय दूतावासाचे प्रमुख श्री मोहित यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास दूतावासचे समुदाय कल्याण व शिक्षण विभाग प्रमुख श्री हरविंदर सिंग आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री योगेंद्र पाल यांची उपस्थिती होती. दिवाळी अंकाचे संपादक अद्वैत खरे तसेच मंडळाचे पदाधिकारी अभिजित माने, वैभव डोलारे आणि केदार जाधव यावेळी उपस्थित होते.

यंदाच्या दिवाळी अंकाचे सुंदर मुखपृष्ठ गीता खरे यांनी तर मलपृष्ठ रसिका काकतकर यांनी सजवले आहे. अंकाचा साचा व शुद्धीकरणात डॅा. प्राजक्ता ओक व जयेश गलगले यांचे सहकार्य मिळाले आहे.

पालवी दिवाळी अंकात म्युनिक मधील सर्व स्थानिक हौशी साहित्यिकांचे वाचनीय लेख, कथा, कविता, मुलाखत, चित्रे, खाद्यपदार्थांच्या रेसिपी आहेत. मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीही ‘पालवी’ दिवाळी अंक ‘इलेक्ट्रॅानिक स्वरूपात’ मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल.

दिवाळी अंक जरूर वाचा आणि आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा !

आपले,
महाराष्ट्र मंडळ म्युनिक
म्युनिक साहित्य ग्रुप