Makar Sankrant 2023

महाराष्ट्र मंडळ म्युनिक

Makar Sankrant 2023

1574 1574 people viewed this event.

✨ मकर संक्रात २०२३ ✨

सर्वांना महाराष्ट्र मंडळ म्युनिकच्या नवीन कार्यकारिणीतर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

ह्या वर्षी आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्यासाठी खास कार्यक्रम घेऊन येणार आहोत. संपूर्ण वर्षभराच्या विविधरंगी कार्यक्रमांची सूची आम्ही लवकरच जाहीर करू.

✨ यावर्षीचा पहिला कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित केला आहे. निमित्त आहे संक्रांतीचे हळदीकुंकू ✨

कार्यक्रम – संक्रांतीचे हळदीकुंकू
दिनांक – २२ जानेवारी, रविवार
वेळ – दु. ११ ते ४
स्थळ – Kulturzentrum Ubo9, Ubostraße 9, 81245 München

विशेष आकर्षण

  • हळदी कुंकू
  • “Fun games”
  • वाण
  • रुचकर जेवण

मग विचार काय करताय ?
भरजरी साड्या, दागदागिने शोधून ठेवा ! हळदीकुंकू म्हंटलं की थोडंफार नटून-थटून जायलाच हवं, नाही का ?

कार्यक्रमाच्या नोंदणी बद्दल अधिक माहिती लवकरच देण्यात येईल.

विशेष सूचना :
📍कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर बंधन आहे. त्यामुळे प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
📍कार्यक्रम फक्त महिला आणि त्यांच्या सोबतची लहान मुले (घरी राहू न शकणारी) यांच्यासाठीच राखीव आहे.
📍कार्यक्रमा दरम्यान २०२२ सालच्या सभासदांसाठी “कालनिर्णय” चे वाटप करण्यात येणार आहे.

आपले स्नेहाभिलाषी,
कार्यकारिणी २०२३
महाराष्ट्र मंडळ म्युनिक

Event registration closed.
 

Date And Time

22-01-2023 @ 11:00 AM to
22-01-2023 @ 04:00 PM
 

Registration End Date

18-01-2023
 

Event Category

Share With Friends