मराठी तितुका मेळवावा

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने जगभरातील मराठी भाषिक प्रतिनिधींना एकत्र आणून दि. २७ ते २९ जानेवारी दरम्यान वाशी, नवी मुंबई येथे ‘विश्व मराठी संमेलन २०२४’ आयोजित केले होते.

ह्या संमेलनात महाराष्ट्र मंडळ म्युनिक, कार्यकारिणी समिती २०२३ मधील योगेश वाडकर, कृतार्थ धामणकर, अद्वैत खरे, केदार जाधव तसेच ‘शिवप्रतिष्ठान म्युनिक’ तर्फे संदीप मुसळे व राहुल जोशी यांनी सहभाग घेतला. जर्मनीमधील इतर मंडळे त्याचबरोबर जगभरातील विविध मराठी भाषिक संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

मराठी भाषा व शालेय शिक्षण खात्याचे मंत्री श्री. दीपकजी केसरकर यांच्या विशेष पुढाकाराने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. रमेश बैस, मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री श्री. दीपकजी केसरकर, मराठी भाषिकांचा बुलंद आवाज असलेले श्री. राज ठाकरे अशा अग्रगण्य व्यक्तींनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले. त्याचबरोबर लाभलेले पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांसारख्या दिग्गज मराठी शास्त्रज्ञ व विचारवंतांचे मार्गदर्शन ही या संमेलनातील स्मरणीय बाब !

अतिशय उत्कृष्ट असे सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर मराठी भाषा संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा, परिसंवाद हे संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. जगभर स्थायिक असलेल्या मराठी माणसाबरोबरच मराठी भाषेची व्याप्ती वाढत आहे आणि ही व्याप्ती म्हणजे मराठी भाषेच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे याची नोंद या संमेलनाच्या निमित्ताने घेण्यात आली.

तीन दिवसांच्या ह्या कार्यक्रमात मंडळातर्फे सहभागी झालेल्या सर्वांना अतिशय चांगला आणि समृद्ध करणारा अनुभव आला. अनेक ख्यातनाम कलाकार, अभ्यासक, भाषा विभागातील शासकीय अधिकारी, पत्रकार, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी अशा अनेकांना
भेटण्याची, संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मिळाली. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे जगभरात पसरलेल्या महाराष्ट्र मंडळांच्या प्रतिनिधींना भेटून विविध उपक्रमाबद्दल माहितीची देवाण-घेवाण करता आली. संमेलनात महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष योगेश वाडकर व मंडळाच्या ‘माय मराठी’ या शालेय उपक्रमाचे प्रमुख राहुल जोशी, मराठीतून जर्मन शिकवण्याच्या उपक्रमाविषयी केदार जाधव, तसेच शिवप्रतिष्ठान म्युनिकतर्फे संदीप मुसळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मराठी भाषेसंबंधी झालेले आणि विशेषतः सद्य परिस्थितीचा आढावा घेणारे, तसेच भविष्याच्या वाटचालीचा विचार करणारे परिसंवाद महत्त्वाचे म्हणता येतील. त्याचबरोबर संमेलनातील काही सांस्कृतिक कार्यक्रम तर अगदी मंत्रमुग्ध करणारे होते !

जर्मनीत अग्रणी असलेल्या ‘महाराष्ट्र मंडळ म्युनिक’ ने गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर ग्रंथालय, दिवाळी अंक, मराठी शाळा, ‘म्युनिक नाट्यरंग’ अशा विविध उपक्रमांमधून मराठी भाषेच्या या वैश्विक प्रवासात उत्साही सहभाग घेतलेला आहे.

मंडळाच्या सदस्यांच्या या विश्व मराठी संमेलनातील अनुभवाचा महाराष्ट्र मंडळाच्या पुढील वाटचालीत निश्चितच फायदा होईल.

या संपूर्ण विश्व मराठी संमेलनाचे दृकश्राव्य चित्रण हे युट्युब वर उपलब्ध आहे. थोर मराठी साहित्यिक श्री. विष्णू वामन शिरवाडकर (‘कुसुमाग्रज’) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘महाराष्ट्र मंडळ म्युनिक’ च्या सर्व सभासदांना याचा लाभ घेता यावा म्हणून संपूर्ण कार्यक्रमाच्या संकलित केलेल्या यूट्यूब लिंक्स उपलब्ध करून देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे !

महाराष्ट्रातील अतिशय समृद्ध असे लोककलेचे प्रकार, संगीत, नृत्य या सर्वांनी नटलेल्या कार्यक्रमाच्या या लिंक्स आपल्या आप्तस्वकीयांपर्यंत आवर्जून पोचवाव्यात.

आपल्या मायबोलीच्या या विशेष सोहळ्याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मंडळाच्या कार्यक्रम व उपक्रमांमध्ये उत्साही सहभाग घ्यावा हीच अपेक्षा !

विश्व मराठी संमेलन २०२४ - YouTube Videos

(तांत्रिक अडचण आल्यास लिंक copy करून ब्राउजर मध्ये paste करावी)

विश्व मराठी संमेलन २०२४

उदघाटन सत्र

https://youtu.be/RWLSARsYdvo?si=qWyyVDKbB7tIto1l


परिसंवाद: मराठीचा वैश्विक प्रचार

मुलाखतकार: जयू भाटकर
डॉ. रवींद्र शोभणे (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन)
प्राध्यापिका उषा तांबे, (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ)

https://www.youtube.com/live/a1WVzRDyP-c?feature=shared&t=7220


कवितेचे गाणे होताना
श्री. प्रवीण दवणे (कवी, गीतकार)
सौ. पद्मजा फेणाणी-जोगळेकर, (गायिका)
कौशल इनामदार (संगीतकार)

https://www.youtube.com/live/a1WVzRDyP-c?si=iGxBS8bQzsNYG8I_&t=10726


मा. राज ठाकरे

(भाषण)

https://www.youtube.com/live/CMKWjyh7pCk?feature=shared&t=4870


ज्ञानेश्वरी श्राव्यपुस्तिका उदघाटन
(संगीतकार: राहुल रानडे)
https://www.youtube.com/live/CMKWjyh7pCk?feature=shared&t=3374


परिसंवाद: मराठीच्या प्रचार आणि प्रसारामधे माध्यमांचे योगदान
निलेश खरे संपादक झी २४ तास
E टीव्ही डिजिटल सुरेश ठमके
सूत्रसंचालक: मिलिंद लिमये
https://www.youtube.com/live/CMKWjyh7pCk?feature=shared&t=7817


कर्तृत्ववान मराठी महिला

(विशेष कार्यक्रम)
https://www.youtube.com/live/CMKWjyh7pCk?feature=shared&t=10460


मराठी कथा अभिवाचन
ऐश्वर्या नारकर, गिरीजा ओक-गोडबोले, सुनील बर्वे
https://www.youtube.com/live/CMKWjyh7pCk?feature=shared&t=14479


विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राची गरुडझेप
पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर (शास्त्रज्ञ, तत्वज्ञ – ३९ डॉक्टरेट्स, २३५ शोधनिबंध, १८+ पुस्तके, २८+ पेटंट्स)
https://www.youtube.com/live/CMKWjyh7pCk?si=2MYoI0L6cx_WX6dO&t=16845


उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
(भाषण)
https://www.youtube.com/live/CMKWjyh7pCk?feature=shared&t=25112


बोलावा विठ्ठल
भक्तिसंगीत: श्री. संजीव अभ्यंकर, सौ. मंजुषा कुलकर्णी-पाटील, रघुनंदन पणशीकर
https://www.youtube.com/live/_GSavpw4rKw?feature=shared&t=440


परिसंवाद: मराठी भाषेचा प्रवास आणि नवीन क्षितिजे
डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष, मराठी साहित्य व संस्कृती मंडळ)
श्री. राजा दीक्षित (अध्यक्ष, मराठी विश्वकोश मंडळ)
श्री. लक्ष्मीकांत देशमुख (अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती)
https://www.youtube.com/live/_GSavpw4rKw?feature=shared&t=8730


माध्यमसंवाद: मराठीच्या प्रसार आणि प्रचारात माध्यमांचे योगदान
श्री. राहुल गडपाले (मुख्य संपादक – सकाळ वाहिनी)
श्री. सम्राट फडणीस (संपादक – सकाळ मुंबई वृत्तपत्र वाहिनी)
श्री. तुलशीदास भोईटे (कार्यकारी संपादक – पुढारी वाहिनी)
सूत्रसंचालक: ओंकार वाबळे
https://www.youtube.com/live/_GSavpw4rKw?feature=shared&t=14130


चर्चासत्र: तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमात मराठीचा वापर
डॉ. आशुतोष जावडेकर
सुयोग रिसबूड
मिलिंद शिंत्रे
https://www.youtube.com/live/_GSavpw4rKw?feature=shared&t=18148


जागर मराठीचा: मराठीच्या जतन-संवर्धनासाठी भारतभर होणारे उपक्रम
शिवप्रतिष्ठान म्युनिक आणि महाराष्ट्र मंडळ म्युनिक व अन्य देशातील मराठी संस्था आणि त्यांचे उपक्रम

https://www.youtube.com/live/_GSavpw4rKw?si=QXQbnro_CNWV7TmK&t=22173


भाषासेतू: मराठीतून जर्मनचा शिकवण्याचा उपक्रम
केदार जाधव (म्युनिक)
https://www.youtube.com/live/_GSavpw4rKw?si=O4kLtn1xV4lFkb8y&t=24687


शिवकल्याण राजा: शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित गाणी
कलाकार: अजित परब, ऋषिकेश रानडे, दत्त मेस्त्री, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे
https://www.youtube.com/live/_GSavpw4rKw?feature=shared&t=34634


नाटक / विजेती लोकांकिका: एकूण पट १
वझे केळकर महाविद्यालय
https://youtu.be/zU54fcmrnc4?si=MBWtpFMIPT3QpOjV&t=37


विश्व मराठी संमेलन २०२४
दिवस १: https://www.youtube.com/live/a1WVzRDyP-c?si=04UPfQQDGZQJv-5g
दिवस २: https://www.youtube.com/live/CMKWjyh7pCk?si=9kpA8TUBd7pCzSN6
दिवस ३: https://www.youtube.com/live/_GSavpw4rKw?si=Apq0ByrGFypmvAaW