Back

महाराष्ट्र मंडळ म्युनिकने एप्रिल २०१९ मध्ये ‘माय मराठी’ उपक्रम सुरु केला. या उपक्रमातून मुलांना मराठी
भाषेतून लेखन – वाचन करता यावे आणि आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, असा उद्देश आहे.

पहिल्या वर्षी ‘गुलनोहोर’ ( वय ४ ते ७ वर्षे ) आणि ‘पारिजात’ ( वय ८ ते १४ वर्षे ) असे दोन गट करून
सुमारे ४५ मुलांना मराठी शिकवायला सुरुवात झाली.

दुसऱ्या वर्षी मुलांची आणि स्वयंसेवकांची संख्या
वाढल्याने , लहान मुलां साठी ‘मोगरा’ ( वय ४ ते ५ वर्षे ) या स्वतंत्र गटाची सुरुवात केली.

ही शाळा सुरु करण्यात श्री. प्रवीण पाटील आणि श्री. राहुल जोशी यांचा मोठा वाटा आहे.
सुरुवातीच्या वर्षांत , शिक्षिका म्हणून

  • ‘गुलमोहोर’ गटासाठी राधा परांजपे, सविता जोशी, मनीषा कशेळकर, ऋतुजा झणकर
  • ‘पारिजात’ गटासाठी गीता खरे , अपर्णा लपालीकर, मैत्रेयी डोलारे, पूजा महाडिक
  • ‘मोगरा’ गटासाठी मधुरा काणे , माधुरी गद्रे , दीप्ती करमरकर , नीलजा होले, शीतल आढाव

यांनी योगदान दिले आहे.

मंडळ या सर्वांचे आभारी आहे.

Back